गांधी जयंती निमित्त कल्याण पूर्वमध्ये जेष्ठ नागरिकांची स्वच्छता मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कल्याण - जागतिक जेष्ठ नागरीक दिन आणि महात्मा गांधी जयंती निमित्त कल्याण पूर्व मधील सुयोग जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

सोमवार ता 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन निमित्त लोकग्राम फेडरेशन हॉलमध्ये प्रबोधन करण्यात आले तर विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ज्ञानदेव भोईर यांच्या हस्ते टी शर्ट वाटप करण्यात आले. 

यावेळी जेष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली अध्यक्ष भोजराज गेंदाळे, सचिव दत्तात्रय मराठे आदींची नियुक्ती करत घोषणा करण्यात आली. तर आज मंगळवार ता 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व मधील लोकग्राम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू जाधव, प्रकाश रावळे सहित अनेकांनी मेहनत घेतली. 

Web Title: Senior citizens' cleanliness campaign in the east of Kalyan on the occasion of Gandhi Jayanti