Corona Vaccination: ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Corona Vaccination: ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी 'या' क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई: मुंबईत तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून या लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. मात्र, अजूनही लसीकरणाविषयी ज्येष्ठ नागरिक अनभिज्ञ आहेत. लसीकरण कुठे, कसे आणि केव्हा करुन घ्यायचे ? शिवाय, लसीकरणासाठी नोंदणी कुठे करायची? कशी करायची ? जे ज्येष्ठ नागरिक मोबाईल फोनचा वापर करत नाहीत, त्यांनी कोविन अॅपवर कशापद्धतीने नोंद करायची असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  दरम्यान, प्रत्येक वॉर्डमध्ये असणाऱ्या वॉर रुमशी संपर्क करुन किंवा आपातकालीन क्रमांक (डिझास्टर क्रमांक) १९१६ या क्रमांकावर संपर्क करुन लसीकरणा संबंधी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकेल असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

एस वॉर्ड मधील 65 वर्षीय हरिश्चन्द्र परब यांना लस टोचून घ्यायची आहे. मात्र, कोरोना लस कुठल्या केंद्रात टोचून घेतात हे त्यांना माहित नाही. जवळच्या खासगी रुग्णालयात लस दिली जाते असे ऐकीव माहिती असले तरी त्या ठिकाणी लसीकरणाला किती पैसे द्यायचे ते माहित नाही. मात्र, पालिका रुग्णालयात लस घ्यायची असल्याने या बाबत कोणाकडे चौकशी करायची या बाबत त्यांना माहिती नाही. शिवाय, लसीकरण केंद्रांवर गेल्यावर किती वेळात नंबर येईल याची ही खात्री नाही.

पालिकेच्या नायर रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहतात. काही न खाता पिता रांगेत उभे राहल्याने त्यांची चिडचिड होते. अशातच जर कोणी मध्ये घुसले तर त्यांचा मनस्ताप होतो आणि ते डॉक्टरांवर ही त्याचा राग काढतात असा अनुभव रुग्णालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितला. शिवाय,
उपनगरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्राबाबत माहितीच नसल्याची बाब समोर येत आहे. असे हजारो ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्राबाबत चौकशी करत आहेत. त्यामुळे, पालिका किंवा राज्य सरकारला लसीकरणाबाबत आणखी जनजागृती वाढवण्याची गरज आहे. बीकेसी येथील कोविड केंद्रावर शिक्षित किंवा उच्च वर्गीय ज्येष्ठ नागरिक दिसून आले. त्यामुळे, जे जास्त शिकलेले नाहीत किंवा ज्यांना मोबाईलचा वापर करता येत नाही अशा लोकांनी कोणाशी संपर्क करावा असा देखील प्रश्न आहेच. त्यातच प्रवासाचा प्रश्न, उन्हाचा चढलेला पारा यासह अनेक समस्या ज्येष्ठांना भेडसावत आहेत.

मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या दत्ताराम पाडावे या ७९ वर्षीय आजोबांना ही लस घ्यायची आहे. पण, त्यांना फक्त ऐकून लसीकरणाबाबत माहिती आहे. पण, लसीकरणासाठी काय करावे लागेल? कुठे जावे लागेल याबाबतची माहिती त्यांना नाही. शिवाय, कोविन अॅपमध्ये कशा पद्धतीने नोंदणी करायची याबाबतही त्यांना माहिती नाही. त्यामुळे, घरोघरी जाऊन जर ज्येष्ठांचे सर्वेक्षण केले किंवा त्यांना माहिती दिली तर लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल असे ही पाडावे यांनी सांगितले.

ज्येष्ठांनी उपस्थित केलेले प्रश्न

बहुतांश ज्येष्ठांना त्यांच्या विभागातील केंद्रांची माहिती नाही.
माहित असलं तरीही कित्येकांना ते लांब वाटत
प्रवासाचा त्रास, इतर आजार
म्हातारपण

 

वॉर रुम आणि १९१६ वर साधा संपर्क, पालिकेचे आवाहन 

पालिकेकडून सोशल मीडिया, प्रिंट मीडियातर्फे जनजागृती केली जाणार आहे. मात्र, सध्या लसीकरण सुरुवातीच्या टप्प्यात असून सतत बदल करावे लागत आहेत. मात्र, आता पुन्हा पोस्टर्स, बॅनर्स , लिफलेट्स बनवण्याचा विचार आहे. अजून थोड्या दिवसांनी लोकांना पूर्ण माहिती मिळेल जसे की, कोणत्या वॉर्डमध्ये कुठे केंद्र आहे, कोणत्या वेळी सुरू असते. पुढच्या दोन ते तीन दिवसांत सर्व सुरळीत होईल. त्यामुळे, जर लसीकरणासंबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपातकालीन व्यवस्थापनाच्या १९१६ किंवा वॉर रुममध्ये संपर्क करुन माहिती घेता येऊ शकते, असेही पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Senior citizens Simple contact on 1916 for Corona vaccination bmc appeal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com