जेष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hussain Dalwai

जेष्ठ कायदेतज्ञ, गांधीवादी आणि माजी मंत्री एडवोकेट हुसेन दलवाई यांचे मुंबईत ९९ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

जेष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन

मुंबई - जेष्ठ कायदेतज्ञ, गांधीवादी आणि माजी मंत्री एडवोकेट हुसेन दलवाई (Hussain Dalwai) यांचे मुंबईत ९९ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन (Death) झाले. चर्चगेट इथल्या इम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.खासदार हुसेन दलवाई यांचे ते चुलत भाऊ होते. एड्वोकेट हुसेन दलवाई यांनी 16 वर्षे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात ते कायदे मंत्री राहीले. एड्वोकेट हुसेन दलवाई यांच्या पश्चात मोठा मुलगा दिलावर, फिरोज, मुश्ताक आणि रेहाना, शहनाज या दोन मुली आहेत.

हुसेन दलवाई यांचा जन्म 17 ऑगस्ट 1922 मध्ये चिपळूण तालुक्यातील मिरोली गावात जन्म झाला. बीए, एलएलबीचे शिक्षण त्यांनी घेतले. 1940 ते 1946 या कालावधीत त्यांनी राष्ट्रीय सेवा दलासोबत काम केलं. 1952 पासून त्यांचा राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाशी संबध आला. त्यानंतर आयुष्यभर काँग्रेस विचारधारेसोबत त्यांची निष्ठा होती. एड. हुसेन दलवाई हे निष्तांता कायदेपटू होते. अनेक दशके त्यांनी बॉम्बे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कायद्याची प्रॅक्टीस केली. दिवंगत यशवंतराव चव्हाण ,वसंतदादा पाटील ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार या नेत्यांसोबत त्यांचे अतिशय जवळचे संबध होते. मुंबईतल्या यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठाणशी ते जूळून होते.अनेक आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनीधीत्व केले.

भूषवलेले पद

  • अध्यक्ष- नव कोकण शिक्षण संस्था, चिपळून

  • संचालक- भारत सेवक समाज

  • १९६२-७८- विधानसभा सदस्य

  • एप्रिल १९८४ - राज्यसभेचे सदस्य

टॅग्स :Congressdeath