esakal | ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जयंत खेर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जयंत खेर यांचे निधन

भारतीय बँकिंगक्षेत्रामध्ये नव्या पद्धतीच्या बँकिंगचा पाया घालणारे, अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आतापर्यंत बँका, वित्तसंस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक मंडळांवर वरिष्ठ पदे भुषवली.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जयंत खेर यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, साहित्यिक व बँकिंग विषयातील जाणकार जयंत खेर (85) यांचे मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक संजीवनी खेर यांचे ते पती होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

भारतीय बँकिंगक्षेत्रामध्ये नव्या पद्धतीच्या बँकिंगचा पाया घालणारे, अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आतापर्यंत बँका, वित्तसंस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या संचालक मंडळांवर वरिष्ठ पदे भुषवली. 1997 मध्ये त्यांना कंपवाताचा त्रास झाल्यावर त्यांच्या कामांची गती मंदावली, तरीही नंतर चार वर्षांनी त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित केली. अनेक इंग्रजी आणि मराठी नियतकालिकांमध्ये त्यांनी आर्थिक विषयावर लेखन केले होते.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

स्टेट बँकेतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी बारा हजार अधिकाऱ्यांच्या संघटनेची स्थापना केली. देशातील अधिकारी वर्गाची ही पहिली संघटना होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील एका मोठ्या कापड गिरणीच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळली. बिझनेस इंडियाचे संपादकीय सल्लागार, सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य, सेंटर फॉर मॅनेजमेंट या संस्थेचे संचालक, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शिअल अँड रिकन्स्ट्रक्शनच्या वतीने अकरा आजारी कंपन्यांचे संचालक, एका ब्रोकिंग कंपनीचे संचालक, ओमान इंटरनॅशनल बँकेचे सल्लागार, बँक ऑफ इंडिया फायनान्स लिमिटेडचे संचालक, मॅनेजमेंट स्ट्रक्चर सिस्टीम लिमिटेडचे संचालक, अशी विविध पदे त्यांनी भुषवली.

नक्की वाचा तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

1989 मध्ये त्यांची एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या व्यवस्थापन समितीवर निवड झाली. तर 2001 मध्ये सोसायटीच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यांनी 197 पुस्तकांचे समालोचन दहा वर्षात केले होते.

 Senior economist Jayant Kher dies read full story