V V Karmarkar : क्रीडा ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 senior marathi sports-reporter-v-v-karmarkar-died-

V V Karmarkar : क्रीडा ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचं निधन

V V Karmarkar : मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. मुंबईतील अंधेरी येथे त्यांने शेवटचा श्वास घेतला.

अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले, तर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले.

पत्रकारितेची सुरुवात करमरकर यांनी नाशिकचे रसरंग साप्ताहिक नंतर मुंबईतील दैनिक लोकमित्रमधून केली. 1992 मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले त्यानंतर खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन आदींनी मराठी वाचक जोडला जाऊ लागला. त्यानंतर हळूहळू सर्वच दैनिकांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

दिल्लीमध्ये 1982च्या झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बांधकामात सुमारे 100 मजूर मृत्युमुखी पडले होते. त्यांनी त्याची कैफियत ‘रक्तरंजित’ मधून मांडली. सुरेश कलमाडी यांच्यावर देखील त्यांनी टीका केली.

क्रीडा संकुलांची उभारणी त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांना वाचा फोडली होती. करमरकर मुळचे नाशिकचे होते आणि त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण MA करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली.