महायुती 200 जागाही पार करणार नाही; कोणत्या मोठ्या शिवसैनिकानी प्रतिक्रिया दिलीये पाहा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

महायुतीला 220  ते 230 जागा मिळतील असं मला वाटत नाही.  महायुती 200 जागा पार करणार नाही असं मला वाटतं असं जोशी यांनी सांगितलं. 

मुंबई : महायुती 200 जागाही पार करणार नाही असं म्हणत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना भाजपला घराचा आहेर दिलाय.  एका बाजूला शिवसेना आणि भाजपचे नेते महायुतीला 220 ते 230 जागा मिळतील असं बोलत असताना, आता मनोहर जोशी यांनी शिवसेना आणि भाजपला घराचा आहेर दिलाय. 

महायुतीला 220  ते 230 जागा मिळतील असं मला वाटत नाही.  महायुती 200 जागा पार करणार नाही असं मला वाटतं असं जोशी यांनी सांगितलं. 

एक दिवस आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही मनोहर जोशी यांनी व्यक्त केलाय.  त्याचबरोबर मी पक्षनेतृत्वाविरुद्ध कधीच जात नाही, मी कायमच पक्षाची शिस्त पाळणारा शिवसैनिक आहे आणि मला विश्वास आहे शिवसेनेचाच मुख्यमंत्री येईल असंही मनोहर जोशी यांनी म्हटलंय.  

मुंबईत मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातायत. अशातच मुंबईतल्या भायखळा इथलं मतदान केंद्र रांगोळ्या आणि फुग्यांनी सजविण्यात आलंय. त्याचसोबत मतदान करणाऱ्या मतदारांना मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेरील 'वन रुपी क्लिनिक'मध्ये मोफत आरोग्य तपासणी करता येणार आहे.  

WebTitle : senior shivsena leader manohar joshi on vishansabha election 2019 and bjp shivsena 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior shivsena leader manohar joshi on vishansabha election 2019 and bjp shivsena