मोफत औषधाच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई -  सरकारी कर्मचारी असून, दमा असलेल्या वृद्धांना मोफत औषधे देत असल्याची बतावणी करत महिलेचे दागिने घेऊन पळालेल्या दोघांना खार पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. 9) अटक केली. न्यायालयाने धीरज राजाराम राठोड आणि दिनेश हिरालाल मारवी या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

खार परिसरात 18 नोव्हेंबरला राठोड आणि मारवी यांनी रस्त्यावरून जात असलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेशी संवाद साधला. सरकारी कर्मचारी आहोत, सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध देत आहोत, अशी बतावणी त्यांनी केली. तुम्हाला दमा आहे का, असे विचारून औषध देऊ, असे त्यांनी सांगितले. गळ्यातील सोनसाखळी दिसल्यास तुम्हाला औषध मिळणार नाही, असे सांगत या भामट्यांनी सोनसाखळी रुमालात बांधून ठेवण्याची सूचना केली. त्यावर विश्‍वास ठेवत या महिलेने गळ्यातील सोनसाखळी काढून रुमालात बांधली. त्यानंतर या दोघांनी हातचलाखी करून महिलेची सोनसाखळी लांबवली. 

Web Title: senior women jewelery Loot in mumbai