कल्याणकडे जाणाऱ्या गाडीत मांस सापडल्याने खळबळ

नंदकिशोर मलबारी
बुधवार, 11 एप्रिल 2018

सरळगांव (ठाणे) : माळशेज घाट मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या टोयोटा कंपनीच्या चारचाकी गाडीचा शिसेवाडी येथे अपघात झाला. पण या अपघात झालेल्या गाडीत जनावरांचे मास सापडल्याने खळबळ माजली आहे.

सरळगांव (ठाणे) : माळशेज घाट मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या टोयोटा कंपनीच्या चारचाकी गाडीचा शिसेवाडी येथे अपघात झाला. पण या अपघात झालेल्या गाडीत जनावरांचे मास सापडल्याने खळबळ माजली आहे.

चालकास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळशेज घाट मार्गे कल्याण कडे भरधाव वेगात टोयोटा कंपनीची चारचाकी गाडी कल्याण कडे जात होती. माळशेज घाटातील शिसेवाडी येथील एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी एका झाडावर आदळून अपघात झाला. या घटनेची खबर मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. धनंजय पोरे यांनी घटना स्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त गाडीची झडती घेत असताना या गाडीत 800 किलो जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास आले. या गाडीचा चालक अब्दुल करीम शेक याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Sensation caused by the discovery of meat in a car near Kalyan