ती संशयास्पद स्पीड बोट गुजरातची!

File Photo
File Photo

मुंबई : दमणच्या समुद्रातून तारापूरकडे जाणारी एक अनोळखी संशयित स्पीडबोट दिसल्याची माहिती सागरी तटरक्षक दलाला मिळाली आहे. त्यानुसार तपास यंत्रणांनी या बोटीची शोधमोहीम हाती घेतली असून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात केलेल्या शोधमोहिमेत शनिवारी सायंकाळी संशयास्पद स्पीडबोट सापडली असून ती इंडियन व्हेस्सल ऑफ गुजरात असल्याचे  पालघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शनिवार (ता. १७) रात्री दोनच्या सुमारास दमणच्या समुद्रात अनोळखी स्पीडबोट तारापूरच्या दिशेने जात असल्याचा संदेश दमण पोलिसांनी पालघर नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर, पोलिस तपास यंत्रणेने डहाणूकडे धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. या शोधमोहिमेत पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, बंदर विभाग, या सर्व तपास यंत्रणा सामील झाल्या.

तपास यंत्रणेने रात्रीपासूनच ही शोधमोहीम राबविली; मात्र संशयित स्पीडबोटीचा तपास शनिवारी दुपारपर्यंत लागला नव्हता. डहाणूतील सर्व सुरक्षा तपासणी नाक्‍यांवर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते. पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंग, अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण, पो निरीक्षक प्रवीण कसबे व डहाणू, वाणगाव, तारापूर, घोलवड, कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी डहाणूत तळ 
ठोकून होते.

गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवरील  सागरी हालचालीच्या अनुषंगाने पालघर पोिलस सदैव तत्पर असून समुद्रात तसेच समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ नजीकचे पोिलस ठाण्यात अथवा पोिलस नियंत्रण कक्षात तशी माहिती नागरिकानी द्यावी असे आवाहन पालघर पोिलस दलातर्फे करण्यात आले आहे.

संशयित स्पीडबोट दिसल्याचा संदेश दमण पोलिसांकडून प्राप्त होताच, सर्व तपासणी यंत्रणांनी डहाणूकडे धाव घेतली. तेथील तपासणी नाके सील केले आहेत. तसेच पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, बंदर विभाग संयुक्तपणे शोध मोहीम राबवीत आहेत. तसेच किनारपट्टीवरील लोकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
- योगेश चव्हाण, अप्पर पोलिस अधीक्षक
, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com