संपूर्ण लॉकडाउनच्या भीतीने शेअर बाजार गडगडला; 882 अंकांची घसरण

१ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स ४८ हजारांखाली
Lockdown Sensex
Lockdown SensexE Sakal

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच संपूर्ण लॉकडाऊनची भीती यामुळे आज भारतीय शेअर बाजारांचे निर्देशांक पावणेदोन टक्क्यांच्या आसपास घसरले. सेन्सेक्स 882 अंक तर निफ्टी 258 अंक घसरला. सेन्सेक्स आज 48 हजारांच्या खाली घसरला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आजही भारतीय बाजारात पडझड झाली व गुंतवणुकदारांचे पावणेचार लाखकोटी रुपये बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील सर्व समभागांचे एकूण मूल्य दोनशेपाच लाखकोटी रुपयांपेक्षा जास्त होते. आज ते घसरून दोनशेएक लाखकोटी रुपयांच्या आसपास झाले. विशेष म्हणजे आज जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजी असूनही भारतीय बाजारांनी त्याच्या उलट कल दाखवला. आज दिवसअखेरीस सेन्सेक्स 47 हजार 949 अंकांवर तर निफ्टी 14 हजार 359 अंकांवर स्थिरावला. एक फेब्रुवारीनंतर सेन्सेक्स प्रथमच 48 हजारांच्या खाली आला आहे.

Lockdown Sensex
"लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 समभागांपैकी फक्त डॉ. रेड्डी व इन्फोसिस या दोनच समभागांच्या दरांमध्ये अनुक्रमे दीड व पाऊण टक्का वाढ झाली. तर निफ्टीच्या प्रमुख 50 समभागांपैकी रेड्डी, इन्फोसिस, विप्रो, ब्रिटानिया व सिप्ला या पाचच समभागांच्या दरांमध्ये वाढ झाली. उरलेल्या सर्व समभागांचे दर घसरले. आज सेन्सेक्समधील इंडसइंड बँक, कोटक बँक, महिंद्रा आणि महिंद्रा (बंद भाव 794 रु.), बजाज ऑटो, अॅक्सीस बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट या सर्व समभागांचे दर तीन ते चार टक्क्यांपर्यंत घसरले. लार्सन अँड टुब्रो 1300 च्या जवळ येताना 1310 रुपयांवर बंद झाला, तर रिलायन्स 1900 च्या जवळ येताना 1902 रुपयांवर बंद झाला.

Lockdown Sensex
राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

आजचे सोन्या-चांदीचे दर

24 कॅरेट सोने (10 ग्रॅम) - 46 हजार 70 रूपये

चांदी (1 किलो) - 69 हजार 200 रुपये

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com