निर्देशांकाची तेजीसह सांगता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने शुक्रवारी (ता.१५) भांडवली बाजारात तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात त्रिशतकी झेप घेणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स दिवसअखेर ७०.२१ अंशांच्या तेजीसह ४० हजार ३५६.६९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २३.३५ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ८९५.४५ अंशांवर बंद झाला.

आजच्या सत्रात भारती एअरटेलच्या शेअरमध्ये सर्वाधिक ८ टक्के वाढ झाली. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत सर्वाधिक तोटा झाला असला, तरी केंद्र सरकारकडून दूरसंपर्क सेवा शुल्क निश्‍चित करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे दूरसंपर्क सेवा क्षेत्रात सुसूत्रता येण्याची शक्‍यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी एअरटेलच्या निराशाजनक निकालांकडे दुर्लक्ष करत जोरदार खरेदी केली.

त्याशिवाय एसबीआय, कोटक बॅंक, सन फार्मा, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील आदी शेअर तेजीसह बंद झाले. ऑटो शेअर्समध्ये शुक्रवारी नफावसुली दिसून आली. हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो, मारुती, आयटीसी, वेदांता, एनटीपीसी, टेक महिंद्रा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्‍स ३३ अंशांच्या वाढीसह सप्ताहाची सांगता केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex close with hike