मध्यवैतरणात स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

१७ वर्षे रखडलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र मध्य वैतरणामध्ये सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेली १७ वर्षे रखडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मुंबईत जानेवारीपासून होणार मांजरांची नसबंदी

शिवसेनेने आपल्या २००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर सुरू करण्याचा मनोदय जाहीर केला होता. मात्र, वेळोवेळी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. राज्य सरकारने गुरुवारी घेतलेल्या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले.

आघाडी सरकारने नाकारला होता प्रस्ताव
वर्ष २०११ मध्ये आघाडी सरकारने मुंबई महापालिकेचा हा प्रस्ताव फेटाळला होता. महापालिकेने पायाभूत सुविधा देण्याचे काम करावे, वीजनिर्मिती हे महापालिकेचे कार्यक्षेत्र नसल्याचा शेराही हा प्रस्ताव नाकारताना आघाडी सरकारने केला होता.

Separate power generation center in the center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Separate power generation center in the center