सर्व्हर डाऊनमुळे एटीएम बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

जुईनगर - नव्या वर्षात एटीएममधून चार हजार 500 काढता येणार असल्याचे सरकारने जाहीर केले असले तरी जुईनगर परिसरातील अनेक एटीएम सर्व्हर डाऊनमुळे बंद आहेत. काही एटीएममधील प्रोग्राम बदलला नसल्यामुळे तेथे दोन ते अडीच हजारच मिळत आहेत. त्यामुळे पैशासाठी येथील नागरिकांची भटकंती सुरूच आहे. 

येथील सहकारी बॅंकांच्या एटीएमचे सर्व्हर डाऊन आहे. काही राष्ट्रीय बॅंकांच्या एटीएममधून दोन किंवा अडीच हजारपेक्षा जास्त पैसे मिळत नाहीत. याविषयी बॅंकेत चौकशी केली असता, एटीएम मशीनचे सॉफ्टवेअर बदलण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. 100 च्या पुरेशा नोटा नसल्याने एटीएममधून चार हजारांपर्यंत पैसे काढता येतील, अशी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्याने दिली. येथील एटीएममधून दोन हजारांच्या नोटा मिळत असल्यामुळे ते सुटे करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. 

माझे एसबीआय बॅंकेत खाते आहे. नेरूळ सेक्‍टर 10 मधील कॅनरा बॅंकेच्या एटीएममधून सकाळी पैसे काढण्यासाठी गेलो; परंतु तेथे अडीच हजारच मिळाले. 
- प्रणय चव्हाण, नागरिक.

Web Title: Server shut down due to ATM