ठाणे-दिवादरम्यान लोकल सेवा रखडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

ठाणे-दिवा रेल्वेस्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने दुपारी सव्वाचार वाजल्यापासून मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद पडली आहे...

ठाणे : सोमवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ठाणे- दिवा रेल्वेस्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दुपारची वेळ असल्याने लोकलला तुरळक गर्दी होती. मात्र, रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबई आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

आज सकाळपासूनच ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. मात्र, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना रेल्वेच्या खोळंब्यामुळे त्रासाला समोरे जावे लागत आहे. रोजच्या लोकलहालमुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत. 

दुरुस्तीचे प्रयत्न सुरू
लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होईल याची माहिती रेल्वेने अद्याप दिलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Service between Thane-Diva railway stations stopped due to technical issue