मुंबई उपनगरात रस्त्यांवर एलईडी बसवणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे. 

मुंबई : रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे. 

रिलायन्स एनर्जीतर्फे मुंबई उपनगरात महापालिकेच्या 88 हजार, मिरा-भाईंदर महापालिकेच्या 12 हजार आणि उर्वरित एमएमआरडीए, म्हाडा, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पथदिव्यांना वीज पुरवली जाते. सध्या 55 दशलक्ष युनिट विजेचा वापर एक लाख दोन हजार पथदिवे प्रकाशित करण्यासाठी होत आहे. मुंबई उपनगरात 88 हजार पथदिव्यांसाठी 47.45 दशलक्ष युनिट वीज लागते. एलईडी लावल्यास 28.47 दशलक्ष युनिटची गरज भासेल. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये सर्व महापालिकांचे पथदिवे एलईडी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पथदिवे कार्यक्रमांतर्गत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड यासह सर्व प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर एलईडी दिवे उभारण्यात येतील.

Web Title: To set up LEDs in the Mumbai