नऊ थर उभारणारच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

प्रसंगी कारागृहातही जाण्याचा "जय जवान‘चा निर्धार
मुंबई - सुरक्षेच्या मुद्द्यामुळे 18 वर्षांखालील मुलांना दहीहंडी खेळामध्ये सहभागी करू नये, असे आमचेही मत आहे; मात्र हंडीच्या उंचीवर घातलेल्या मर्यादेमुळे अत्यंत नाराज आहोत. हा उत्सव वाचवण्यासाठी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारावास झाला तरी चालेल; पण आमचे कौशल्य दाखवणारच, अशी प्रतिक्रिया जोगेश्‍वरी येथील जय जवान दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी बुधवारी (ता. 17) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिली.

कोणी या खेळाचे आयोजन करो वा न करो. आम्ही तयारी केली आहे. आम्ही नऊ थर लीलया उभारू शकतो. यंदाच्या उत्सवामध्येही आम्ही ते थर उभारणार आहोत. दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचे रूप देतानाच न्यायालयाने या खेळातील थरार कमी केला आहे, असेही ते म्हणाले. आम्ही 18 वर्षांखालील मुलांना या उत्सवात सहभागी करून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या मंडळाचे बाळगोपाळ दोन ते तीन महिन्यांपासून कसून सराव करत आहेत. त्यात कठोर व्यायामाचाही समावेश आहे. अपघात होऊच नये, असे आमचे प्रयत्न असतात. आमच्या पथकाने रचलेल्या नऊ थरांची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. उत्सवाच्या किमान दोन महिने आधीपासून आम्ही खेळाडूंना प्रशिक्षण देत असतो. त्यांची थराला उभे राहण्यासाठी मानसिकता तयार करतो; मात्र न्यायालयाचा निर्णय येतो आणि सर्व सरावावर पाणी फेरले जाते. त्याचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम होतो; मात्र आम्ही नेहमीच्या उत्साहात हा उत्सव साजरा करू, असे ते म्हणाले. 

Web Title: Set up a nine-layer!