नवी मुंबईतील आगीत ७ अग्निशमन अधिकारी घुसमटले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

आजची सकाळ उगवली ती नवी मुंबईतील नेरूळ सीवूड्समधील एका २१ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने. यातील वाईट गोष्ट म्हणजे या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे तब्बल ७ जवान जखमी झालेत.

नवी मुंबई - आजची सकाळ उगवली ती नवी मुंबईतील नेरूळ सीवूड्समधील एका २१ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीने. यातील वाईट गोष्ट म्हणजे या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे तब्बल ७ जवान जखमी झालेत. या सर्व फायर फायटर्सना वाशीच्या महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

मोठी बातमी - दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा! 

आज सकाळीच  नवी मुंबईतील सीवूड नेरुळ परिसरातील सेक्टर 44 मध्ये सी होम्स नामक 21 मजली इमारतीला आग लागली होती. सदर आग ही इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आणि १९ व्या मजल्यावरील एका डुप्लेक्स घराला लागल्याची माहिती आहे.

मोठी बातमी - अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

सदर इमारत ही उंच असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. 

मोठी बातमी - क्या बात हैं ! 'या' भारतीय शास्त्रज्ञाने शोधलीये कोरोनावरील लस!

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीच्या आधारे या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा निकामी झालेली. यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. आग लागल्याचं समजताच घरातील कुटुंब घराबाहेर आलं होतं. त्यामुळे या भीषण आगीनंतर सदर घरातील कुटुंबियांना कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरातील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं अग्निशमनदलाचं म्हणणं आहे.  

seven firefighters suffocates while dozing off massive fire in sea woods sector 44


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven firefighters suffocates while dozing off massive fire in sea woods sector 44