मुंबईत २०२२ पर्यंत सात लाख घरे

Home
Home

मुंबई - मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू असतो. परंतु, किमती आवाक्‍याबाहेर गेल्यामुळे मुंबईत घर घेणे कठीण झाले आहे. मुंबईत स्वतःचे घर नसलेली साडेसहा लाख कुटुंबे परवडणाऱ्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत २०२२ पर्यंत सात लाख ९० हजार घरे बांधण्यात येणार आहेत. विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यास टप्प्याटप्प्याने घरे बांधण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. 

राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणानुसार मोठ्या संख्येने परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशात अशी सुमारे १० लाख घरे बांधली जाणार असून, त्यापैकी सात लाख ९० हजार घरे मुंबई शहर आणि उपनगरात बांधली जातील. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत स्वतःचे घर नसलेली तब्बल साडेसहा लाख कुटुंबे आहेत. ही कुटुंबे अनेक वर्षांपासून परवडणाऱ्या घरांच्या प्रतीक्षेत आहेत. परवडणाऱ्या घरांसाठी ११ योजना असून, त्यात झोपडट्टी पुनर्विकास, उपकरप्राप्त इमारतींचा विकास, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा, म्हाडा पुनर्विकास, खासगी-सार्वजनिक भागीदारीतून निर्माण होणारी घरे तसेच पंतप्रधान आवास आदी योजनांचा समावेश आहे. 

मुंबई महापालिकेने तयार केलेल्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात भर पडेल, असा विश्‍वास विकास नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बांधकामाच्या किमतीत घर
मुंबईत काही वर्षांत मोठ्या संख्येने परवडणारी घरे निर्माण होतील. मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला वेग येईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी बांधकामाच्या किमतीत ही घरे निर्माण होतील. गरज असलेल्या प्रत्येकाला घर मिळालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com