मुंबईत सात नवे तरणतलाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - मुंबईत गोवंडीसह सात ठिकाणी नवे तरणतलाव बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यापैकी तीन तलावांसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई - मुंबईत गोवंडीसह सात ठिकाणी नवे तरणतलाव बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यापैकी तीन तलावांसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबईत महापालिकेचे सात तरणतलाव आहेत. खासगी जिमखाने आणि क्‍लबमध्येही अनेक तरणतलाव आहेत; मात्र तेथील शुल्क सामान्य नागरिकांना परवडणारे नसते. त्यामुळे पालिकेने आणखी तरणतलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी वरळी, मालाड आणि विक्रोळी येथील तरणतलावांसाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत; तर अंधेरी पूर्व-पश्‍चिम, गोवंडी तसेच पश्‍चिम उपनगरात एका ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या तरणतलावासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. हे सात तरणतलाव बांधण्याचा निर्णय घेतल्यावर इतर ठिकाणीही तरणतलाव बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत. त्यामुळे अद्याप या जागा प्राथमिक स्तरावरच निश्‍चित करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास त्यांच्यात बदलही होऊ शकतो, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दादर येथील महात्मा गांधी तरणतलाव ऑलिम्पिक आकाराचे आहे. या तलावात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाही होऊ शकतात. त्याच धर्तीवर जागेच्या उपलब्धतेनुसार इतर ठिकाणी तरणतलाव बांधण्यात येणार आहेत. तेथे २०० प्रेक्षक सामावू शकतील, अशी गॅलरीही तयार करण्याचा पालिकेचा विचार आहे.

मुंबईतील स्वीमिंग पूल
पालिकेचे तरणतलाव : दादर, कांदिवली, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी, मुलुंड, दहिसर.
महापालिकेच्या तरणतलावांचे वार्षिक शुल्क : ४ ते ५ हजार 
खासगी तरणतलावांचे वार्षिक शुल्क : ५० हजारांपासून पुढे

Web Title: Seven new Swimming Tank in Mumbai