रायगडमध्ये सात जणींची निकराची झुंज

रायगडमध्ये सात जणींची निकराची झुंज

अलिबाग : महिलांना 50 टक्के आरक्षणाची चर्चा सुरू असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकाप, भाजप आणि शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारीपासून दूर ठेवलेले आहे. जिल्ह्यातील सात मतदार संघात 78 उमेदवार आहेत. त्यामध्ये अवघ्या सात महिला आहेत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

रायगड जिल्हा हा सामाजिक, शैक्षणिक चळवळींचा केंद्रबिंदू राहिला आहे. महाडचा सत्याग्रह, चिरनेरचा जंगल सत्याग्रह, चरीचा संप, विशेष आर्तिक क्षेत्राविरोधातील आंदोलन अशी त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. दुर्गम जिल्हा असला तरी शैक्षणिक क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. परंतु महिलांना राजकीय क्षेत्रात फारसे स्तान मिळत नाही, अशी चर्चा अनेक वेळा होते. या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही बाब पुन्हा अधोरेखीत झाली आहे. 

अलिबाग मतदार संघात 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. ऍड. श्रध्दा ठाकूर (कॉंग्रेस) यांचा त्यामध्ये समावेश आहे. कर्जतमध्ये 11 उमेदवार असून त्यात पीपल्स पार्टी आँफ इंडिया पक्षातील महिला उमेदवार पुष्पा म्हात्रे यांना संधी मिळाली आहे. 
उरण विधानसभा मतदार संघात आठ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये एकही महिला उमेदवाराचा समावेश नाही. महाड विधानसभा मतदार संघात आठही पुरुष उमेदवार आहेत. 
पेण विधानसभा मतदार संघात 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात कॉंग्रेसच्या नंदा राजेंद्र म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार सुनीता गणेश पवार यांना संधी मिळाली आहे. 

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, बहुजन समाज पक्षातील सुमन यशवंत सकपाळ, अपक्षातील उमेदवार महेक पोपेरे या तीन महिलांना संधी देण्यात आली आहे. 

पनवेल मतदार संघात दहा पुरुष उमेदवार आहेत. एकाही महिलेला संधी मिळाली नाही. सातही विधानसभा मतदारसंघात एकूण 78 पैकी 7 महिलांचा समावेश आहे. 
वेगवेगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना, विधानसभा निवडणूकीत त्यांना बरोबरीने संधी देण्यास राजकिय पक्ष अपयशी ठरले, अशी टीका होत आहे. विशेष म्हणजे भाजप, शिवसेना आणि शेकापने एकाही महिलेला या वेळी संधी दिली नाही. 

वेगवेगळ्या क्षेत्राबरोबरच राजकारणात ही महिला चांगले काम करतात. मात्र, त्यांना उमेदवारी देणयत येत नाही. त्यामुळे नाराजी आहे. कॉंग्रेसने दोन महिलांना संधी देऊन आदर्श निर्माण केला आहे. 
-कुंदा ठाकूर, सदस्या, रायगड जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com