रडण्याचा आवाज आला म्हणून ते चेंबरकडे धावले... 

रडण्याचा आवाज आला म्हणून ते चेंबरकडे धावले... 


उल्हासनगर : रस्त्याकडेच्या आठ फूट खोल ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सात वर्षीय मुलगी पडल्याची घटना शनिवारी (ता. 25) उल्हासनगर येथे घडली. या वेळी प्रसंगावधान दाखवत सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या दोन सुरक्षारक्षकांनी मुलीला चेंबरमधून सुखरूप बाहेर काढून घरी पोहचवले.

 कल्याण-मुरबाड महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने सेंच्युरी रेयॉन हॉस्पिटलच्या काही अंतरावर आठ फूट खोल असलेल्या ड्रेनेज चेंबरचे झाकण उघडे ठेवले होते. सेंच्युरी शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारी प्रगती कुशवाह ही विद्यार्थिनी शिकवणीवरून घरी जात असताना चेंबरमध्ये पडली. त्याच वेळेस प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत तालमीचा सराव आटोपून परतणारे सेंच्युरी रेयॉन कंपनीचे सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त सैनिक विजय चौगुले, आर. के. सिंह यांनी चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकला व ते चेंबरकडे धावले.

या वेळी नागरिकांच्या मदतीने दोघांनी चेंबरमध्ये उतरून प्रगतीला बाहेर काढले. प्रगतीचे वडील मनोज कुशवाह सेंच्युरी रेयॉन कंपनीत काम करत असून ते कंपनीने दिलेल्या फ्लॅटमध्ये राहतात. प्रगतीने घरचा पत्ता सांगितल्यावर विजय चौगुले, आर. के. सिंग यांनी तिला तिची आई पूजा यांच्याकडे सोपवले. प्रगतीने तिच्या आईला हकिकत सांगितल्यानंतर आईने दोघा सुरक्षारक्षकांचे आभार मानले. दरम्यान, ढिसाळपणे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर एमएमआरडीएने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com