आश्रमशाळांत वेतन आयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

अकरा हजार कुटुंबांना लाभ
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागू केल्याने जवळपास ११ हजार ४२७ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या सुधारित वेतनसंरचना लागू केल्याने रुपये १२५ कोटी रुपये अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. हा  निर्णय तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. तसेच विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ही डॉ.कुटे यांनी यावेळी दिली.

मुंबई - विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागासवर्ग व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन मधील पूर्णवेळ शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. 

यासंबधीचा शासन निर्णय निर्गिमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग  व विशेष मागासप्रवर्ग कल्याण मंत्री डॉ.संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ.कुटे म्हणाले, विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक ५२७, माध्यमिक २९७, विद्यानिकेतन एक व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चार आश्रमशाळा अशा एकूण ८२९ आश्रमशाळांमध्ये सुधारित वेतन रचना लागू होणार आहे. सुमारे ११, ४२७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventh Pay Commission in Ashramshala