पनवेलमधील प्रदूषणाचे सावट कायम

तळोजा एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमुळे होणारे प्रदुषण.
तळोजा एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमुळे होणारे प्रदुषण.

पनवेल : पनवेलमध्ये स्मार्ट सिटीची स्वप्नं बघताना देखणं शहर, आधुनिक बांधकाम, मेट्रोचं जाळं, प्रशस्त रस्ते या निकषांबरोबरच शहरातलं प्रदूषण नियंत्रण हीदेखील महत्त्वाची बाब आहे; मात्र त्याबाबतच पालिका गंभीर नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार करण्यात आलेल्या पनवेल पालिकेच्या सद्यस्थितीचा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरही पालिका प्रशासनाच्या वतीने प्रदूषण नियंत्रणासाठी अद्याप पावले उचलण्यात आली नाहीत. प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रत्यक्षात कधी उपाययोजना करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पनवेल पालिका हद्दीतील प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. पालिकेत समाविष्ट तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणविरोधात राष्ट्रीय हरित लवादात स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवादाने औद्योगिक वसाहतीमधून होत असलेल्या सर्वच प्रकारच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तसेच प्रदूषण महामंडळाच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com