esakal | 40 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम; 'रिहॅबीलिटेशन सेंटर' होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

lungs

40 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम; 'रिहॅबीलिटेशन सेंटर' होणार सुरु

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात (Sewri TB Hospital) उपचार घेणाऱ्या 40 टक्के रुग्णांचे फुफ्फुस खराब (Lung Decease) होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी क्षयरोग रुग्णालयात 'रिहॅबीलिटेशन सेंटर' (Rehabilitation Center) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी (Government permission) मिळाली असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता कौर (Namrata kaur) यांनी दिली.

हेही वाचा: एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांची नियुक्ती

महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात सर्वाधिक क्षयरोग बाधितांवर उपचार केले जातात. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर साधारणता 75 ते 80 टक्के आहे.क्षयरोगाच्या विषाणूंचा सर्वाधिक परिणाम हा रुग्णाच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांचे फुफ्फुस खराब होते. 'पोस्ट टीबी' आशा प्रकारच्या समस्या जाणवतात. शिवाय अशा रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका असल्याने अशा रुग्णांसाठी 'रिहॅबीलिटेशन सेंटर' सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'रिहॅबीलिटेशन सेंटर' मध्ये पोस्ट टीबी रुग्णांना तपासले जाईल. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे. त्याशिवाय रुग्णांची फिजिओथेरपी तसेच समुपदेशन देखील करण्यात येणार आहे. यासाठी 30 लाख रुपयांची मशिनरी विकत घ्यावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला प्रशासकीय मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे या केंद्राचे लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता कौर यांनी दिली. पोस्ट टीबी प्रमाणेच पोस्ट कोविड समस्या देखील येई असल्याने या 'रिहॅबीलिटेशन सेंटर'चा फायदा कोविड रुग्णांना देखील होणार असल्याचे डॉ.कौर म्हणाल्या.

शिवडीच्या टीबी रुग्णालयात दररोज क्षयरोग बाधित सरासरी 40 रुग्ण दाखल होतात. टीबी रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांमध्ये 72 टक्के पुरुष तर 27 टक्के महिला रुग्ण आहेत. त्यात मुंबईतील 51 टक्के, इतर जिल्ह्यातील 13.88 टक्के तर राज्याबाहेरील 34.72 टक्के रुग्ण दाखल आहेत. मुंबई बाहेरील 48.06 टक्के रुग्ण टीबी रुग्णालयात उपचार घेतात. क्षयरोग बाधित रुग्णांमध्ये 16 ते 40 वयोगटातील 86.09 टक्के रुग्णांचा समावेश आहे.

loading image
go to top