अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

नवी मुंबई : रबाळे येथील दिवा नाका भागात राहणाऱ्या दुकानदाराने, त्याच भागातील एका ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पीडित मुलीच्या चुलत भावावरही अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. सचिन लोंढे (२५) असे या आरोपीचे नाव असून, रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

सचिन लोंढे हा आरोपी रबाळे दिवा नाका परिसरात किराणा दुकान चालवतो, तर पीडित मुलगी देखील त्याच भागात राहण्यास आहे. पीडित मुलीचे आई-वडील हे कामानिमित्त दिवसभर बाहेर राहत असल्याने, पीडित मुलगी आपल्या आजीसोबत राहत असे. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीत पीडित मुलगी ही आपल्या आजीच्या घराजवळ खेळत असताना आरोपी सचिन लोंढे याने तिला दुकानात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडित मुलीने कुणालाही सांगू नये, यासाठी लोंढेने पीडित मुलीला व तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतरदेखील आरोपी सचिन याने पीडित मुलीवर चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतर पीडित मुलीच्या पोटामध्ये दुखू लागल्यानंतर तिची आई तिला डॉक्‍टरकडे घेऊन गेली. मात्र, त्यानंतरही तिची पोटदुखी न थांबल्याने, तिची आईने तिच्याकडे विचारपूस केली. यावेळी दुकानदार सचिन लोंढे याने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने अधिक माहिती घेतली असता, त्याने लहानग्या पुतण्यावरही दोन ते तीन वेळा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सचिन लोंढे याच्यावर बलात्कारासह अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणे व पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com