बहिणीवर लैंगिक अत्याचार; सख्ख्या भावाला अटक

File Photo
File Photo

पनवेल : पनवेल भागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने त्याच्या 16 वर्षीय सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेतील पीडित मुलीने घाबरून बदनामीच्या भीतीने भावाचे कृत्य लपविण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खांदेश्वर पोलिसांनी या घटनेतील नराधम भावावर बलात्कार आणि पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेतील आरोपी तरुण व त्याची बहीण आई-वडिलांसोबत पनवेल भागात राहतात. आरोपी तरुण व त्याची बहीण दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. गत ऑगस्ट महिन्यामध्ये पीडित मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास झोपलेली असताना तिच्या भावाने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

लैंगिक अत्याचार करणारा आपला सख्खा मोठा भाऊच असल्याने पीडित मुलीने घाबरून तसेच बदनामीच्या भीतीने सदर प्रकाराची माहिती कुणालाच दिली नाही; मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर सदरचे कृत्य मोठ्या भावानेच केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्यांना धक्का बसला.

पीडित मुलीच्या आई-वडिलांनी गरोदर असलेल्या आपल्या मुलीला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवून आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला.

गुन्हा पनवेल भागात घडल्याने आझाद मैदान पोलिसांनी सदरचा गुन्हा खांदेश्वर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी तरुणावर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com