लैंगिक छळाच्या "आयआयटी'त तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - आयआयटी-मुंबईतील विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर केला आहे. याप्रकरणी दोषी विद्यार्थ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. 19) आयआयटी अधिष्ठात्यांकडे गेलेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेट नाकारल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारवर ठिय्या दिला.

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या "त्या' विद्यार्थ्याने आयआयटीमधील अनेक कनिष्ठ विद्यार्थ्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या कन्फेशन पेजवरून आपल्यासोबत झालेल्या प्रकाराला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा आहे.

आरोपी विद्यार्थ्याने 15 ज्युनिअर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी गेल्या सहा-सात महिन्यांत आल्या आहेत. आयआयटी मुंबईच्या शिस्तपालन समितीकडे या तक्रारी आल्या होत्या. परिस्थितीजन्य पुरावे मिळू न शकल्याने विद्यार्थ्याचे निलंबन करता येणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आयआयटीच्या अधिष्ठाता सौम्य मुखर्जी यांना निवेदन देण्यासाठी गेले; मात्र त्यांनी भेट दिली नाही. म्हणून या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करून मुखर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

बहिष्काराचा इशारा
लैंगिक छळाचा आरोप असलेल्या विद्यार्थ्यावर कारवाई न झाल्यामुळे सोशल मीडियातून विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. आरोपीवर कारवाई न झाल्यास पदवीदान समारंभावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Web Title: Sexual harassment IIT Complaint crime