राष्ट्रवादीला धक्का

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

शहापूर - राष्ट्रवादी काँग्रेसला शहापूर तालुक्‍यात जोरदार धक्का बसला असून, पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आणि खरेदी-विक्री संघाचे संचालक प्रमोद बसवंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर राष्ट्रवादीच्याच अल्याणीच्या सरपंच-उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्‍यातील अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांची भाजपकडे वाटचाल सुरू आहे. प्रमोद बसवंत यांनीही राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश कल्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.

अल्याणी गावातील सरपंच मनाबाई हिलम, उपसरपंच बाळकृष्ण बुधा वाळिंबे, अल्याणी सेवा सहकारी संस्थेचे सदस्य नारायण वाळिंबे, ग्रामपंचायत सदस्य लहू वाघ, मंदा वाघ, भास्कर वाघ, वाळकू वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने अल्याणीतील अंतर्गत रस्त्यांना निधी मिळाला आहे. नवीन ट्रान्स्फॉर्मर, नळपाणी योजना, समाज मंदिर आदी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. खासदार पाटील यांच्याकडून गावातील विकासकामांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सरपंच मनाबाई हिलम यांनी सांगितले.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, विभागीय सरचिटणीस काशिनाथ भाकरे, विभागीय आदिवासी सेलचे अध्यक्ष अशोक ईरणक, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सतीश सापळे, शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाळिंबे, कैलास गुंड उपस्थित होते.

Web Title: Shahapur news NCP BJP