किंग खानचा जीवनप्रवास '25 ईयर्स ऑफ ए लाइफ'मध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मुंबई - चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या जीवनप्रवासाचे "25 ईयर्स ऑफ ए लाइफ' या पुस्तकाचे नुकतेच त्याच्या हस्ते प्रकाशन झाले. पत्रकार, चित्रपट निर्माते समर खान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशन सोहळ्यास अब्बास मस्तान, कुंदन शाह, अनुभव सिन्हा, पियूष पांडे आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींसह पेनार्ड रिकार्ड इंडियाचे राजा बॅनर्जीही उपस्थित होते.

या पुस्तकाबाबत शाहरूख खान म्हणाला, "अनेक वर्षांपूर्वी दिल्लीहून आलेल्या माझ्यासाठी चित्रपट उद्योगात 25 वर्षे काढणे स्वप्नवत होते. ही वर्षे आकर्षण, मेहनत आणि विविध चढ-उतारांनी भरलेली होती. माझ्यावर, माझ्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना मी हे पुस्तक अर्पण करतो. आज मी जो काही आहे, तो चाहत्यांमुळे. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो.

समर खान म्हणाले, हे पुस्तक माझ्यासाठी शाहरूखची गोष्ट वेगळ्या नजरेतून सांगण्यासाठी उत्तम संधी होती. माझ्या स्वप्नातील प्रकल्प सत्यात उतरवण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानतो.

या पुस्तकात चित्रपटसृष्टीतील शाहरूखच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा आहे.

Web Title: shahrukh khan journey in 25 Years of a life