आरोपी आकाश मुंबईतून तडीपार

अनिश पाटील
सोमवार, 11 जून 2018

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा भोगलेला आरोपी आकाश जाधव ऊर्फ गोट्या याला मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्याविरोधात मारहाण, खंडणी, अपहरण यांसारखे पाच गुन्हे दाखल झाले होते.

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा भोगलेला आरोपी आकाश जाधव ऊर्फ गोट्या याला मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्याविरोधात मारहाण, खंडणी, अपहरण यांसारखे पाच गुन्हे दाखल झाले होते.

मुंबई पोलिस कायदा कलम ५६(१) अंतर्गत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २२ वर्षांचा गोट्या शक्ती मिल बलात्कार प्रकरणावेळी अल्पवयीन होता. त्या वेळी त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगल्यानंतरही तो सुधारला नाही. बलात्कार प्रकरण हा आकाशविरोधातील चौथा गुन्हा आहे. याशिवाय दोन अदखलपात्र गुन्हेही त्याच्यावर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा गोट्याने केला आहे. मात्र गोट्याचा हा दावा खोटा असल्याचे पोलिसांचे म्हणणे  आहे. गोट्याचे कुटुंबीय महालक्ष्मी येथे राहत नसतानाही  गोट्या नेहमी या परिसरात वास्तव्य करायचा. तेथील काही उनाड मुलांच्या सोबतीत त्याने हे गुन्हे केले होते. त्या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याच्याकडून पुन्हा बेकायदा कृत्य करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले होते; मात्र त्यानंतरही गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली. ३१ जुलैला २०१३ रोजी गोट्याने त्याच्या साथीदारांसह टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्या वेळी त्याचे वय १७ वर्षे होते. त्यामुळे त्याच्यावर विधिग्रस्त बालक म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती; मात्र त्यानंतर आग्रीपाडा व एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल झाले होते. 

Web Title: Shakti mill raping case