अपंग सक्षमीकरण धोरण जाहीर न केल्यास पुरस्कार परत करणार : शंकर साळवे

रविंद्र खरात
शनिवार, 1 डिसेंबर 2018

कल्याण : ''राज्यातील 25 लाखहुन अधिक अपंग (दिव्यांग) बांधवांसाठी अपंग सक्षमीकरण धोरण जाहीर करण्याचे आश्वासन राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी दिले होते मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नसून या सोमवार (ता.3) जागतिक अपंग दिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण जाहीर न केल्यास राज्य शासनाने दिलेला अपंग ( दिव्यांग ) कल्याण राज्य पुरस्कार 2013 त्या दिवशी राज्यशासनाला परत करेल'' असा इशारा राज्याचे अपंग धोरण मसुदा समिती सदस्य आणि पुरस्कार विजेते शंकर साळवे यांनी दिला आहे.

आयुष्यभरासाठी पोलिओमुळे अपंगत्व आले असले तरी जिगरीने स्वतः समवेत आपल्या बांधवांसाठी झटणारे आणि कल्याणमधून समाजकार्याला सुरुवात करणारे शंकर साळवे हे मागील पंधरा वर्षापासून राज्यभरातील अपंग बांधवांच्या विविध मागणीसाठी झटत आहेत. अंध-अपंग संघर्ष समितीच्या माध्यमातून अपंगांच्या प्रश्नांवर सरकार आणि इथल्या व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणाऱ्या साळवे यांनी एसटी महामंडळाच्या बसमध्ये अपंगांना 75 टक्के सवलत मिळवून देण्यात महत्त्वाचा पुढाकार आहे. अपंगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय, अपंगांना सरकारी नोकऱ्यांत 3 टक्के आरक्षण, अपंग आर्थिक विकास महामंडळ, अपंग आणि गटई कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्टॉल्सची उभारणी असे अपंगांचे अनेक प्रश्न तडीस नेण्यासाठी साळवे यांनी विविध संघटनांच्या सहकार्यातून लढाई लढली आहे. या कार्याची दखल घेऊन सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने शंकर साळवे यांना 2012 मध्ये ‘अपंग कल्याण पुरस्कारा’देण्यात आला होता . 

दरम्यान, महिला धोरण, युवा धोरण, क्रीडा धोरण अशी अनेक धोरणं आखली जात असली तरी, अपंगांच्या उत्कर्षासाठी कोणतेचे दिशादर्शक धोरण सरकारकडे नसल्याने ते धोरण व्हावे यासाठी संघर्ष केला होता. राज्यशासनाने मसुदा समिती बनवली त्यात त्यांना सदस्य पद ही दिले होते. तो मसुदा तयार झाला असून ते धोरण जाहीर करू असे राज्य शासनाने 25 नोव्हेंबर 2015 ला आश्वासन दिले होते. मात्र, त्याला 3 वर्ष झाले तरी ते धोरण जाहीर केले नसून रविवारी (ता.2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणच्या दौऱ्यावर असून त्यावेळी त्यांना भेटण्याचा प्रयत्न शंकर साळवे करणार असून त्यावेळी निवेदन ही देतील. मात्र, ''सोमवारी (ता.3 ) जागतिक अपंग दिनाच्या दिवशी जागतिक अपंग दिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण जाहीर न केल्यास राज्य शासनाने दिलेला अपंग (दिव्यांग) 'कल्याण राज्य पुरस्कार 2013' त्या दिवशी राज्यशासनाला परत करेल.'' , असा इशारा राज्याचे अपंग धोरण मसुदा समिती सदस्य आणि पुरस्कार विजेते शंकर साळवे यांनी दिला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धोरण जाहीर करतात का ? याकडे लक्ष्य लागले आहे .

Web Title: Shankar Salve will return the award if the Disability Empowerment policy is not announced