
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबईः महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकरला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ३६ दिवसांचं सत्ता नाट्य रंगलं होतं. भाजपसोबतची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन्ही नेत्यांच्या उत्तम चालींमुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन झालं.
महाविकास आघाडीनं सरकारनं आत्ताचं एक वर्ष पूर्ण केलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. वर्षपूर्तीनंतर दोनच दिवसांत त्यांनी ही भेट घेतली. या भेटीसंदर्भातलं संजय राऊत यांनी ट्विट देखील केलं आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे ऊभे आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पुर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 30, 2020
संजय राऊतांनी ट्विटमध्ये लिहिलं की, शरद पवार यांना आज भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकटे आणि असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित.
अधिक वाचा- मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांविरोधात तक्रार
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापित झालं. या सरकारचं नेतृत्त्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करताहेत. तर शरद पवार हे सरकारसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Sharad Pawar and sanjay raut meeting Raut suggestive statement government after meeting