शरद पवार सहकुटुंबिय 'वर्षा'वर बाप्पाच्या दर्शनाला, सुप्रिया सुळेंकडून 'सीकेपी मूव्हमेंट' शेअर

पूजा विचारे
Tuesday, 1 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यावेळी एका फोटोला सुप्रिया सुळे यांनी सीकेपी मूव्हमेंट असं कॅप्शन देखील दिलं आहे.

मुंबईः आज  अनंत चतुर्दशी... गणेशभक्त आजा आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतले. 

पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यावेळी एका फोटोला सुप्रिया सुळे यांनी सीकेपी मूव्हमेंट असं कॅप्शन देखील दिलं आहे.

गणेशोत्सवानिमित्त ठाकरे-पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह कुटुंबाने मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलेही उपस्थित आणि इतर कुटुंबिय उपस्थित होते.

 

उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, वरुण सरदेसाई आदी मान्यवरही हजर होते. तसेच युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हेदेखील यावेळी वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. त्याआधी सोमवारी संध्याकाळी ही सर्व मंडळी एकत्र जमली होती. 

Sharad Pawar family supriya sule visit CM uddhav Thackeray Varsha Bungalow Ganapati Bappa


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar family supriya sule visit CM uddhav Thackeray Varsha Bungalow Ganapati Bappa