"कॉफी टेबल पुस्तिकेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुनावल्याची नोंद नाही" - शरद पवार

"कॉफी टेबल पुस्तिकेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुनावल्याची नोंद नाही" - शरद पवार

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शरद पवारांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सचिवालयातर्फे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेलं, "जनराज्यपाल : भगतसिंह कोश्यारी" नावाचं कॉफीटेबल बुक पाठवण्यात आलं. यावर शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लेखी स्वरूपात पुस्तकाबाबातचं आपलं मत लिहून पाठवलं आहे. शरद पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलेल्या पुस्तकाबाबतच्या मतामध्ये कोश्यारी यांना काही सवाल विचारलेच आहेत, तर काही उत्तरं ही टोमणे स्वरूपातील आहे असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

शरद पवारांनी कोश्यारी यांना पाठवलेल्या पुस्तकाबाबतच्या मतामध्ये म्हटलंय की, राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आणि आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारं कॉफी टेबल पुस्तक पाठवल्याबाबद्द धन्यवाद. भारतीय संविधानात 'जनराज्यपाल' असा उल्लेख आढळत नाही. पुस्तकात एखाद दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही.

शेवटी शरद पवार म्हणतात की, "आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवल्याबद्दल आभारी आहे."

सध्या महाराष्ट्रात राज्य विरुद्ध राज्यपाल असं शीतयुद्ध सुरु आहे. यात शरद पवारांनी राज्यपालांना दिलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू आता चांगलाच चर्चेत आहे.  
 

sharad pawar gives review to governor bhagat singh koshyari on his coffee table book 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com