'शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे'! या बड्या नेत्याने दिला सल्ला

विनोद राऊत | Saturday, 5 September 2020

राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पक्षात विलीन करून शरद पवारांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी थेट काँग्रेस पक्षाला दिला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पक्षात विलीन करून शरद पवारांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी थेट काँग्रेस पक्षाला दिला आहे. 
काँग्रेसमध्ये राहूल गांधी अध्यक्षपद स्विकारण्यास तयार नाही, तर सोनिया गांधीही त्यासाठी तयार नाही. दुसरा अध्यक्षही काॅंग्रेसला सापडत नाही. त्यामुळे त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अध्यक्षपद द्यावे, अशी माझी काँग्रेसला सूचना असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. अर्थात ही निव्वळ सुचना आहे. या बद्दलचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार

काँग्रेस देशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र पक्षाला चांगले नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता 100 खासदार ही निवडून आणूनशकत नाही. दलित, बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे, असा टोलाही आठवले यांनी लगावला 

आठवले यांच्या ऑफर
काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेतृत्वासंदर्भात पत्र लिहिणारे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांना भाजपमध्ये सहभागी होण्याची ऑफर आठवले यांनी दिली होती. यापुर्वी आठवले यांनी काँग्रेसमधील अनेक बंडखोरांना रिपाईमध्येही सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )