शिवरायांच्या महाराष्ट्रावर 'फर्जिकल स्ट्राईक'; काय म्हणाले उद्धव ठाकरे, शरद पवार?

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकारावर सविस्तर खुलासा केला. 

मुंबई : आज सकाळ सकाळी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिवसभरात नाट्यमय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय जाहीर केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकारावर सविस्तर खुलासा केला. 

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoor
काय म्हणाले शरद पवार?

 • राजभवनात नेलेल्या आमदारांना माहिती नव्हते, त्यांना कशासाठी नेले आहे. 
 • शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहोत. एकत्र राहू. 
 • जे फुटणार आहेत, त्या आमदारांनी या देशात पक्षांतरबंदी कायदा आहे, हे लक्षात ठेवावे. 
 • तीन पक्ष एकत्र येऊन फुटलेल्या आमदारांना निवडणुकीत पाडू 
 • राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या सह्यांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली गेली. 
 • पक्षाकडे असलेल्या आमदारांच्या सह्यांचं पत्र मिळून ते राज्यपालांना सादर केल्याचा आमचा अंदाज 
 • विधानसभेत 30 नोव्हेंबरला फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता येणार नाही.
 • पक्ष वेगळा आणि कुटुंब वेगळे; अजित पवार यांच्यावर पक्षाची शिस्तपालन समिती निर्णय घेईल 
 • सुप्रिया सुळे या केंद्रात आहेत. त्यांना राज्याच्या राजकारणात कोणताही रस नाही.

आणखी बातम्या वाचा 
भाजपला बहुमत साधता येणार नाही : शरद पवार

Image may contain: 3 people, people standing

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

 • ईव्हीएमवरचा आरोप कमी पडलो की काय? म्हणून हा खेळखंडोबा 
 • मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा, मी जाणारच नाही खुर्चिला चिकटून बसेन, असं म्हणणं योग्य
 • आम्ही जे काही करतो ते दिवसा उजेडी करतो, सगळ्यांसमोर करतो 
 • तुमची कृत्यं (भाजपची) रात्रीस खेळ चाले अशी आहेत 
 • तुम्ही (भाजप) हरियाण, बिहारमध्ये विरोधकांना फोडून सरकार स्थापन केलं
 • तुम्हाला (भाजपला) मित्रपक्षही नकोत, विरोधकही नकोत
 • पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखा, शिवरायांच्या महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्रईक 
 • घटनाबाह्य काही करून नये, काही होऊ नये, एवढीच अपेक्षा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar uddhav thackeray joint press conference in mumbai y b chavan center