शरद पवार वाशीत कार्यकर्त्यांच्या भेटीला 

शरद पवार वाशीत कार्यकर्त्यांच्या भेटीला 


नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (ता.15) वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यामुळे शहर राष्ट्रवादीला बसलेल्या धक्‍क्‍यामुळे पवार यांची सभा महत्त्वाची असणार आहे. गणेश नाईक यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले; परंतु त्यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबीयांचा फायदा करून घेतला.

शरद पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मात्र नाईकांनी प्रवाहापासून दूर ठेवले. आता नाईक भाजपत गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही नुकसान होणार नाही, उलट सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे अशोक गावडे यांनी सांगितले. 


गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शरद पवार नवी मुंबईत येत आहेत. गणेश नाईक यांच्यासंदर्भात शरद पवार काय बोलतात, याकडे पक्ष कार्यकर्त्यांसह नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com