शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र आणि म्हटलं...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात पवारांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात पवारांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या पत्रात पवारांनी केंद्राचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

IFSC गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. दुसरीकडे केंद्राच्या या निर्णयावरुन राजकारण देखील तापलं आहे. 

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्यातच आता आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरला स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं 27 एप्रिलला घेतला. त्यातच पंतप्रधान मोदींचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्यामुळे मुंबईतलं हे केंद्र आता गुजरातमध्ये असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी राजकारण बाजूला ठेवून या निर्णयावर पूर्नविचार करावा असं पत्रात म्हटलं आहे. 

राज्यात मद्यविक्रीस परवानगी; मात्र, "हे" नियम असतील बंधनकारक!

शरद पवारांनी पत्रात लिहिलं की...

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. एकमेव मुंबईतून सर्वाधिक जास्त कर मिळतो. गुजरातपेक्षा महाराष्ट्र राज्य हा सर्वात जास्त निधी देणारं राज्य आहे. त्यामुले अशा परिस्थितीत मुंबईतलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईला नेणं योग्य नसून पंतप्रधानांनी हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी पवारांनी मोदींना पत्राद्वारे केली आहे.

केंद्राचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हणत पवारांनी महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा जास्त निधी देता त्यामुळे IFSC चं मु्ख्यालय हे मुंबईमध्येच असायला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच पवारांनी मुंबईतलं केंद्र गांधीनगर येथे हलवणं देशाच्या अर्थकारणाला धोक्यात येईल, अशी भीतीही पवारांनी व्यक्त केली.

कोरोना संसर्गाबाबत तुम्हाला ही आलाय असा मेसेज, जाणून घ्या काय आहे सत्य?

पत्राच्या शेवटी पवारांनी मोदींकडून अपेक्षा व्यक्त करत म्हटलं की, पंतप्रधान राज्यस्तरीय राजकारण बाजूला ठेवून तार्किक आणि न्याय्य निर्णय घेतील आणि या राष्ट्रीय मुद्द्याला महत्त्व देतील. IFSC  प्राधिकरणाची स्थापना भारताची आर्थिक राजधानी मुंबईतच करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्या या पत्रातील भूमिका आणि भावना मोदी समजून घेतील. 

काय सांगता ! शाळेत विलगीकरणात असलेल्या व्यक्ती चक्क घरात...

पत्रासह शरद पवारांनी या संदर्भात एका तासात 12 ट्विट् करत आकडेवारी मांडली आहे. त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, सरकारी सिक्युरिटीजच्या माध्यमातून 26 केंद्राला 26  लाख कोटी रुपये मिळतात. त्यापैकी महाराष्ट्रातून 5 लाख 95 हजार कोटी मिळतात. तर त्यात गुजरातचा वाटा 1 लाख 40 हजार कोटी रुपये (5.4 टक्के ) इतका आहे. त्यामुळे केंद्राचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य असल्याचं पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

sharad pawar writes letter to PM modi in hi letter sharad pawar said


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar writes letter to PM modi in hi letter sharad pawar said