शरद पवारांच्या कष्टाचे फळ मिळणार : जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई : यंदाच्या निवडणूकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत, त्याचे फळ पक्षाला नक्की मिळेल आणि यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ६० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, प्रसारमाध्यमांनी जरी यंदा भाजप 220 जागांवर निवडून येणार असा प्रचार केला आहे. मात्र महाष्ट्रातील जनता केवळ 370 कलम लक्षात न ठेवता, मागील पाच वर्षातील सरकारची कामगिरी देखील जाणून आहे. त्यामुळे यंदा जनता आमच्या बाजुने असल्याचे वातावरण आहे. असा दावा देखील पाटील यांनी केला आहे. 
 
web title : Sharad Pawars hard work will help ncp

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars hard work will help ncp