शेअर बाजारात सेन्सेक्सची 38 हजारांवर उसळी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

त्याचबरोबर निफ्टीनेही पहिल्यांदाच 11, 500 आकडा गाठला आहे. सकाळच्या वेळात आयसीआयसीआय व अॅक्सिस बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली, त्याखालोखाल एसबीआयच्या शेअर्सही खरेदी झाली आहे.

मुंबई : शेअर बाजार चालू होताच आज (ता. 9) सकाळी सेन्सेक्सने उसळी घेतली आहे. इतिहासात पहिल्यांदाच निर्देशांक 38 हजारांवर पोहोचल्याचे कळते, त्यामुळे शेअर बाजार सकाळपासूनच तेजीत चालू आहे. दोन आठवड्यांपूर्वीच सेन्सेक्स 37 हजारांच्या वर गेले होते. 

त्याचबरोबर निफ्टीनेही पहिल्यांदाच 11, 500 आकडा गाठला आहे. सकाळच्या वेळात आयसीआयसीआय व अॅक्सिस बँकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली, त्याखालोखाल एसबीआयच्या शेअर्सही खरेदी झाली आहे. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे, यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.  

 

Web Title: share market sensex on high