"शीनाचा गळा दाबून इंद्राणी तिच्या चेहऱ्यावर बसली होती'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

इंद्राणी, तिचा आधीचा पती आणि तिच्या चालकाने शीनाचा गाडीमध्ये खून केल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी तिला ऑगस्ट 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर तीन महिन्यांनी पीटरलाही अटक करण्यात आली होती

मुंबई - "इंद्राणी मुखर्जीने तिची मुलगी असलेल्या शीना बोराचा दोन्ही हातांनी गळा दाबला; तसेच ती शीनाच्या चेहऱ्यावरही बसली होती,' अशी साक्ष इंद्राणीच्या चालकाने आज (शुक्रवार) मुंबई येथील न्यायालयामध्ये दिली. शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी व तिचा पती पीटर मुखर्जी हे 2015 पासून तुरुंगात आहेत.

इंद्राणीचा चालक श्‍यामावर राय याला अटक करण्यात आल्यानंतर, तब्बल तीन वर्षांनी हा गुन्हा उघड झाला होता. राय याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईजवळील जंगलामधून शीनाच्या मृतदेहाचे अवशेष हस्तगत केले होते. इंद्राणी, तिचा आधीचा पती आणि तिच्या चालकाने शीनाचा गाडीमध्ये खून केल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी तिला ऑगस्ट 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर तीन महिन्यांनी पीटरलाही अटक करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेली साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

इंद्राणीने काडेपेटी घेऊन शीनाला जाळल्याचेही राय याने म्हटले आहे.

Web Title: In Sheena Bora Case, Driver Claims 'Indrani Mukerjea Sat On Her Face, Strangled Her'