इंद्राणीच्या खात्यातून रक्कम काढली नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणाच्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची खासगी सचिव काजल शर्मा हिने इंद्राणीच्या बॅंक खात्यातील रक्कम खोट्या सहीने काढल्याचा आरोप मंगळवारी उलटतपासणीत फेटाळला. मंगळवारी सत्र न्यायालयात न्या. जगदाळे यांच्यासमोर इंद्राणीच्या वकिलांकडून ही उलटतपासणी घेण्यात आली. 

इंद्राणीच्या सांगण्यावरून घराच्या भाडेकराराशी संबंधित कागदपत्रांवर शीनाची खोटी सही केल्याची कबुली काजलने यापूर्वी न्यायालयात दिली होती. त्यावर इंद्राणीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. काजलने केवळ शीनाच्याच नव्हे; तर इंद्राणीच्या नावेही खोट्या सह्या करून बॅंकेतून रक्कम काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यावर आपण इंद्राणीच्या सांगण्यावरून घराच्या भाडेकराराशी संबंधित कागदपत्रांवर शीनाची खोटी सही केली होती, त्यात शीनाचे रिलायन्स कंपनीतील राजीनामा पत्र होते; मात्र इंद्राणीच्या दबावाखाली सह्या केल्या नाहीत, अशी कबुली देताना इंद्राणीची कोणतीही फसवणूक केली नसल्याचे काजलने आज न्यायालयात स्पष्ट केले. 

एप्रिलमध्ये शीनाचे वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून अपहरण करण्यात आले. गाडीतच तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळील गागोदे गावाजवळील जंगलात फेकून दिला. मृतदेह फेकण्यापूर्वी तिची ओळख पटू नये यासाठी पेट्रोल ओतून तो जाळला. 

Web Title: Sheena Bora murder case