शीनाच्या वरळीतील घरात इंद्राणीकडून राहुलला मज्जाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मुंबई - शीनाच्या वरळीतील घरात एप्रिल २०१२ मध्ये दोन-तीन दिवस कुणालाही विशेषत: राहुल मुखर्जी याला येण्यास मनाई करा, असे इंद्राणी मुखर्जी हिने सांगितले होते. या सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांनी विशेष सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीतून ही बाब उघड झाली. 

शीना बोरा हत्याप्रकरणी साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया विशेष सत्र न्यायालयात न्या. जे. सी. जगदाळे यांच्यासमोर सुरू आहे. त्याअंतर्गत वरळीतील मार्लो को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक एम. खेलजे यांची साक्ष नोंदवण्यात आली. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची दोन घरे या इमारतीत आहेत. शीना आणि मुखर्जी यांच्यातील संबंध इंद्राणी आणि पीटर या दोघांनाही आवडत नव्हते. २३ एप्रिल २०१२ रोजी सोसायटीच्या कार्यालयात जात असताना आपल्याला इंद्राणीने अडवून दोन-तीन दिवस राहुल किंवा अन्य कोणालाही या फ्लॅटमध्ये पाठवू नका, अशी सूचना केली होती, असे खेलजे यांनी सरकारी वकिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना सांगितले. 

पीटर मुखर्जीचा वाहनचालक शामवर राय याला २०१५ मध्ये अन्य प्रकरणात अटक झाली. त्यानंतर त्याने दिलेल्या जबानीतून शीनाची हत्या झाल्याचे उघड झाले. ही हत्या तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने केल्याचे समोर आल्‍यानंतर पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती.

Web Title: sheena bora murder case