
Sheetal Mhatre : हे, बाळासाहेबांचे संस्कार विसरले, पण...; व्हायरल व्हिडीओवर म्हात्रेंनी मांडली भूमिका
मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरी देखील आम्ही उत्तर दिलं नाही. मात्र ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणं टाकून ते मातोश्री फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलं. ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि पेजेसवर ते व्हायरल करण्यात आल्याचं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं.
स्त्रिच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल तर चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात येता. यापूर्वी घोसाळकर यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितलं होतं. पण ऐकल नाही. मात्र कालच्या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री शिंदेंचा फोन मला आला. त्यांनी सांगितलं, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे शिंदे म्हणाल्याचंही म्हात्रे यांनी सांगितलं.
ठाकरे गटाच्या आय़टी सेलकडून या गोष्टी व्हायरल करण्याच्या सूचना मिळत होत्या. पायाखालची वाळू सरकरल्यावर माणूस या थराला जातो. असे व्हिडीओ शेअर करून तुमचा पक्ष मोठा होणार का? हे बाळासाहेबांचे संस्कार विसरले आहेत, त्यामुळे मनाला वेदाना होतात, अशी खंत म्हात्रे यांनी व्यक्त केली.
दरम्यान प्रकाश सुर्वे यांची तब्येत ठिक नाहीये. ते मागील १५ दिवसांपासून रुग्णालयात होते. ते तीन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांचा घसा दुखत आहे. त्यामुळे ते बोलू शकत नव्हते. काल पुन्हा त्यांच्या तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते बोलले नसून ते फोनवरून माझ्या संपर्कात आहे. त्यांचा मुलगा राज देखील माझ्यासोबत असल्याचं म्हात्रे यांनी म्हटलं.