शेकरूंच्या संख्येत दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

माथेरान - महाराष्ट्राचा राज्यप्राणी अशी ओळख असलेल्या शेकरू ऊर्फ ऋतुफाची माथेरानमधील संख्या वाढली आहे. माथेरानमध्ये गेल्या वर्षी शेकरूंची संख्या २२ इतकी होती. त्यात दुपटीहून अधिक वाढ होऊन यंदा ती संख्या ४८ वर गेली आहे. 

माथेरानच्या जंगलात भेकर, रानडुक्कर सर्रास पाहायला मिळतात. आता शेकरूसुद्धा मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. 

माथेरानचे प्रवेशद्वार असणारे दस्तुरी, अमनलॉज रेल्वे स्थानक, मंकी पॉइंट, एम. जी. रोड, सिमसंस टॅन्क परिसर, गारबेट पॉइंट रोड या ठिकाणी वन विभागाने गस्त घालून सर्वेक्षण केले आहे. 

वनरक्षक वाढवा
माथेरानच्या जंगलात प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे वनरक्षकांची संख्या खूपच कमी आहे. येथे फक्त एक वनपाल आणि एक वनरक्षक आहे. जंगल मोठे असूनही वनरक्षक कमी आहेत. त्यामुळे वनरक्षक वाढविण्याच्या मागणीला माथेरानमध्ये आता जोर धरला आहे.

Web Title: shekaru increase in the number of double