रत्नाकर मतकरी यांना शेळके पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा शांताबाई शेळके पुरस्कार नुकताच ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, उषा मेहता आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी मतकरी यांनी नाटक नेमके कसे पाहावे हे सांगतानाच नाटकाचे वेगवेगळे फॉर्म, ते हाताळण्याची पद्धत, बालनाट्याचा स्वतंत्र परीघ आदी पैलूंवर विचार मांडले. भारतकुमार राऊत यांनी मतकरी यांचा "अरण्यक' ते "इंदिरा'पर्यंतचा प्रवासही त्यांनी उलगडून दाखवला.

Web Title: shelake award to ratnakar matkari