esakal | शिक्षणोत्सवाचा राज्यभरात जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शिक्षणोत्सवाचा राज्यभरात जल्लोष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गत दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आज पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी राज्यभरातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी (Students), शिक्षकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी मुंबईत (mumbai) ३० हजार, तर राज्यातील २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये रांगोळ्या, पायघड्या टाकण्यात आल्या. काही शाळांमध्ये सनई, ढोल-ताशांच्या गजरात फुगड्या, पारंपरिक लेझीम खेळून विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील तीन शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती दाखवून विद्याथ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापकांनी काही दिवस तरी विद्याथ्र्यांनी भावनिक संवाद साधावा, असे आवाहन केले.

हेही वाचा: "ई पीक पाहणीत देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम करायचेय"

पहिल्याच दिवशी २५ लाख विद्यार्थ्यांची हजेरी मुंबई महापालिकेच्या ७५५ शाळांमध्ये आठवी ते दहावीचे ३० हजार २५० विद्यार्थी, ४ हजार ७७६ शिक्षक, ८७५ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते; तर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये २५ लाख ३७ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

loading image
go to top