ED विरोधात शिवसेना आक्रमक; महामुंबईतील शिवसैनिक रस्त्यावर उतरणार

समीर सुर्वे
Saturday, 2 January 2021

अंमलबजावणी संचनालयाविरोधात शिवसेना आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत मंगळवारी (ता.5) ईडी कार्यालयात हजर राहाणार आहेत. त्याच वेळी महामुंबईतील शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील मुंबईत दाखल होणार आहेत. 

मुंबई  : अंमलबजावणी संचनालयाविरोधात शिवसेना आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत मंगळवारी (ता.5) ईडी कार्यालयात हजर राहाणार आहेत. त्याच वेळी महामुंबईतील शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील मुंबईत दाखल होणार आहेत. 
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीकडून नोटीस येण्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा असतानाच शरद पवार यांनी स्वत: ईडी कार्यालयात हजर राहाण्याचा निर्णय घेतला. ते ईडी कार्यालयासाठी निघाले असता राज्यातील विविध भागांतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे पोलिसांना कुलाबा परिसरातील काही रस्तेही बंद करावे लागले होते. अखेर ईडीकडून आपण कार्यालयात येऊ नये, असे आवाहन त्यांना करण्यात आले होते. त्याच पद्धतीने शिवसेनेनेही आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

वर्षा राऊत यांना 55 लाख रकमेप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे; तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांची दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणेच शिवसेनेनेही ईडी विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मिरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबईतून शिवसेनेचे कार्यकर्ते मंगळवारी मुंबईत दाखल होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप ईडीचा वापर करत असल्याचा आरोप यापूर्वीच राऊत यांनी केला आहे. त्यानंतर आता ईडीसह भाजप विरोधातही शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे.

Shiv Sena aggressive against ED varsha raut will present at EDs office

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena aggressive against ED varsha raut will present at EDs office