उल्हासनगरमध्ये शिवसेनेची आक्रमक खेळी

गोविंद तुपे - सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीम
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - उल्हासनगर महापालिका शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून स्थानिक साई पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या भाजपचा मानस होता. मात्र शिवसेनेने आक्रमक खेळी करीत स्थानिक साई पक्षाचे नगरसेवकच फोडण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात साई पक्षाच्या चार नगरसेवकांसोबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकाही घेतल्या असल्याची विश्‍वसनीय सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे सेनेवर कुरघोडी करून सत्ता स्थापन करून पहाणाऱ्या भाजपलाही यामध्यमातून धक्का देण्यासाठी सेना नेत्यांनी तयारी केली आहे.

उल्हासनगर महापालिकत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 33 जागा मिळवून भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला असला तरी बहुमत सिध्द करण्यासाठी आणखी सहा नगरसेवकांची भाजपला गरज आहे. स्थानिक साई पक्षाचे 11 नगरसेवक निवडूण आले आहेत. आणि विकासाच्या मुद्‌द्‌याखाली साई पक्षाने विनाशर्त पाठींबा दिल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यातच घाई-घाईने भाजपने साई पक्षाचे नेते जीवन इदनानी यांची आणि मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणली व तात्काळ सत्ता स्थापनेची घोषणाही केली होती.

भाजपच्या या दबावतंत्राला चोख उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. विशेष म्हणजे साई पक्षाच्या चार नगरसेवकासोबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकाही घेतल्या आहेत. त्यामुळे भविष्यात साई पक्षाच्या काही नगरसेवकांच्या खांद्यावर भगवा दिसला तर आश्‍चर्य वाटून घेवू नका असे शिवसेनेचे स्थानिक नेते सांगत आहेत. तर आमचे बंडखोर परत स्वग्रही येत आहेत त्यामुळे आम्हाला चिंता नसल्याचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या या कुरघोडीच्या राजकारणात साई पक्षाचे किती नगरसेवक कुणाच्या गळाला लागतात हे पहावे लागणार आहे

Web Title: Shiv Sena aggressive in Ulhasnagar municipal corporation