मेट्रोविरोधी खळ्ळखट्याक्!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

  • गिरगावात शिवसेनेकडून काम बंद; वाहनांचीही तोडफोड
  • रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने गिरगावातील रहिवासी हैराण

मुंबई : ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक समस्येविरोधात शिवसेनेने सोमवारी (ता. १८) आक्रमक पाऊल उचलले. गिरगावात मेट्रो ३ चे काम बंद पाडत शिवसेनेने डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तोडफोड केली. 

निवृत्त शास्त्रज्ञाला फेसबुक फ्रेंण्डचा गंडा

मेट्रो ३ चे काम रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने गिरगावातील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. शिवसेनेने या कामाविरोधात दंड थोपटत आंदोलनाचा इशारा दिला होता.  आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कामाच्या ठिकाणी डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या ‘डी. बी. रिॲल्टी’च्या डम्परची तोडफोड केली; तसेच डम्परचालक आणि क्‍लीनरला पिटाळून लावले.

2020 मध्ये भाजपाचाच महापौर

मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. गिरगावात मेट्रो ३ प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या कामामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. खोदकामांमुळे स्थानिक रहिवाशांना घरापर्यंत जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत सोमवारी खळ्ळखट्याक केले.

तारिख पे तारिखमुळे पीएमसी खातेधारक संतप्त

मेट्रो ३ चे काम वेगाने सुरू आहे. गिरगावनजीक काही वर्षांपासून हे काम सुरू असून याठिकाणी पोकलेनद्वारे ड्रिलिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे आसपासच्या परिसराला हादरे बसत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. शिवाय, डेब्रिज उचलणाऱ्या डम्परच्या आवाजामुळेही रहिवासी हैराण झाले आहेत. अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena agitation against Metro